माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट.

विजयदादांना पाहताच हनुमंत बापूंना अश्रू अनावर झाले.

मोरोची ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोरोची येथे स्वर्गीय बकुळाबाई देवबा सुळ पाटील यांचे वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते त्यानिमित्त विजयदादांनी सुळ पाटील परिवार यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळेस सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख, शिवामृत दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन, धनगर आरक्षण कृषी समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील, मोरोचीचे माजी सरपंच जालिंदर सुळ पाटील, रमाकांत सुळ पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त उमेश सुळ पाटील यांच्यासह सुळ परिवारातील सदस्य उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि सुळ पाटील परिवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मोहिते पाटील परिवार यांनीसुद्धा राजकारणात हनुमंत बापू सुळ यांच्या घराण्याला चांगले स्थान दिले होते. धनगर आरक्षण कृती समितीच्या वेळी समाजाबरोबर बापूंनी निर्णय घेतल्याने मोहिते पाटील व सुळ पाटील यांचे राजकीय संबंधांमध्ये अंतर पडलेले होते. मात्र राजकारणापलीकडे मोहिते पाटील आणि सुळ पाटील परिवार यांनी सलोख्याचे संबंध ठेवून नाते अधिक दृढ केलेले होते. सुखदुःखात नेहमी एकत्र गाठीभेटी असतात. यावेळी विजयदादांना पाहिल्यानंतर हनुमंत बापू यांना अश्रू अनावर झालेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.
Next articleशंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे येथील विभागीय केंद्राच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here