माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले.

माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्हा परिषदेमधील महिलाराज संपले, दोनच महिलांसाठी जिल्हा परिषद गट झाले आरक्षित.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट आहेत, त्यामध्ये तांदुळवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी वेळापूर व दहिगाव गट आरक्षित झालेला आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी पुरुषांसाठी कन्हेर व फोंडशिरस गट आरक्षित झालेला आहे. सर्वसाधारण ओपनसाठी माळीनगर, यशवंतनगर, पिलीव, संग्रामनगर, बोरगाव, मांडवे गट ओपन झालेले आहेत.

माळशिरस तालुक्यातील गत निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील आठ महिला जिल्हा परिषद सदस्य होत्या. यंदाच्या आरक्षणात फक्त दोनच ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदमधील माळशिरस तालुक्यातील महिला राज संपुष्टात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शिका सौ. राधाबाई बोरकर खंडाळी गणातून तर विधानसभा अध्यक्ष साहिल आतार खुडूस गणातून निवडणूक लढणार.
Next articleमाळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण गण व गटांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here