ऊसतोड कामगारांना माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या शुभहस्ते वाटप करून भाजपचे सरपंच दादासाहेब खरात यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कर्नाटक राज्याचे प्रभारी माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना ऊसतोड मजुरांचे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अडचण निर्माण झालेली आहे, त्यांना सहकार्य करून मदत करण्याचे आवाहन केलेले होते. आमदार राम सातपुते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोटेवाडी ता. माळशिरस येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मोटेवाडी गावचे सरपंच दादासाहेब खरात यांच्यावतीने माळशिरस तालुका भाजपचे संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी केरबा देवकाते, आप्पा पाटील, दत्ता वायदंडे, सागर ठेंगल, सागर माने, मारुती मोटे, विठ्ठल मोटे, धवन नामदास, समाधान माने, दादा वायदंडे यांच्यासह ऊस तोड कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गाळपासाठी माळशिरस तालुक्यातून ऊस पुरवठा केला जात आहे. यासाठी लागणारे ऊस तोड मजूर मोठ्या प्रमाणात माळशिरस तालुक्यात आलेले आहेत. अवकाळी आलेल्या पावसाने ऊसतोड मजुरांचे जनजीवन विस्कळीत झालेले होते. अनेकांच्या झोपडीमध्ये पाणी शिरले होते ता काहींचे संसार पाण्यावर तरंगत होते. राहण्यासाठी निवारा नव्हता, अशा बिकट परिस्थितीत ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नये त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचे सुचित केले होते. त्याप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोटेवाडी येथे ऊस तोड मजूर कामगारांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मोटेवाडी गावामध्ये पाच ते सहा कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या असंख्य टोळ्या ऊस तोडणीकरता आलेले आहेत. सर्वांची सोय भारतीय जनता पार्टीच्या वतीने व मोटेवाडी गावचे सरपंच भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात यांनी केलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng