विकासरत्न विजय दादांच्या वाटेवरून माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार वाटचाल सुरू आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात विकास कामांची घोडदौड सुरू आहे.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनता व मतदार यांना शुभेच्छांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न श्री विजयसिंह मोहिते पाटील उर्फ विजय दादा यांच्या विकास वाटेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व आई-वडिलांच्या आशीर्वादाने मतदार संघात विकास कामांची घोडदौड सुरू आहे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मतदार संघात विकास कामांची दमदार वाटचाल सुरू आहे. 12 मार्च वाढदिवस लोकप्रिय दमदार आमदार यांचा असल्याने वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनता व मतदार यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे पंढरपूर रोडवर मांडवे 50 फाटा हॉटेल एकादशी पाठीमागे राहत्या घराशेजारी शुभेच्छा जनतेच्या स्वीकारण्यासाठी जनतेला हक्काचे व्यासपीठ तयार केलेले आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी अनेक मंत्री पदाच्या खात्याचा पदभार सांभाळून तालुक्यात जिल्ह्यात व राज्यात आदर्श मंत्र म्हणून काम केलेले आहे माळशिरस तालुक्यामध्ये विकास करीत असताना विजयसिंह मोहिते पाटील यांनी दूरदृष्टी ठेवलेली होती त्याच पद्धतीने सर्वांगीण विकास करण्याचे काम लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे सुरू आहे. मतदार संघात काम करीत असताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विशेष सहकार्य व कृपा आशीर्वादामुळे मतदार संघात विकास कामांची गंगा आणलेली आहे अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून माळशिरस तालुक्यामध्ये लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जनतेच्या मनावर आदर्श वागणूक, सुसंस्कृत स्वभाव, कामाची पद्धत, सर्वात मिळून मिसळून वागणे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण इतर वेळी समाजकारण, रस्ते लाईट वीज पाणी या मूलभूत सुविधा बरोबर अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे, शालेय विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवणे, गरीब व गरजू लोकांच्या रुग्णांची मोफत ऑपरेशन करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे, अशा अनेक सर्व गुणसंपन्न असणाऱ्या आमदारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता मतदार संघातील लोकांची मनोमन शुभेच्छा देण्याची इच्छा असल्याने आमदार राम सातपुते मित्रपरिवार यांनी राहत्या घराशेजारी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शामियाना उभारला आहे सदरच्या ठिकाणी दुपारी 04 वाजल्यापासून सायंकाळी 07 वाजेपर्यंत जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल यांच्या वतीने वाढदिवसाचा कार्यक्रम लाईव्ह ठेवून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा मनोदय आहे तरी सर्वांनी लाईव्ह प्रक्षेपण याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. .https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते रितेशदादा पालवे यांचा फलक लक्ष वेधून घेत आहे…
Next articleबहुजन समाजातील सर्वांनीच इतर पारायण करण्यापेक्षा क्रांतिकारी महामानवाचे कर्तुत्वाची पारायण करावित – पुरुषोत्तम खेडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here