विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत भविष्य घडवण्यासाठी नातेपुते येथे एस.एन.डी करिअर अकॅडमीचे उद्घाटन

नातेपुते (बारामती झटका)

शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूल येथे सायंकाळी सहा वाजता एस.एन.डी. करिअर अकॅडमीचे उद्घाटन व एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्कूलचे चेअरमन तथा नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली. सदर करियर अकॅडमीचे उद्घाटन अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे तसेच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या करिअर अकॅडमी मध्ये एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत कोर्सेस मध्ये गट ‘ब’ पोस्टसाठी पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच गट ‘क’ पोस्टसाठी उत्पादन शुल्क निरीक्षक, लिपिक टंकलेखक मंत्रालय व इतर शासकीय विभाग, कर सहाय्यक वस्तू व सेवा कर तसेच सरळ सेवा परीक्षा अंतर्गत कोर्सेस मध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक, पोलीस भरती इतर लिपिक भरती असे अनेक कोर्सेस या करिअर अकॅडमी मध्ये घेतले जाणार असून शारीरिक चाचणी तयारीसाठी व लेखी परीक्षासाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षक काम पाहणार असल्याचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी सांगितले.

नातेपुते सारख्या ग्रामीण भागात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एस एन डी करिअर अकॅडमीची स्थापना होत असल्याने विद्यार्थ्यांना करिअर अकॅडमीसाठी बाहेरगावी जाऊन कोर्सेस करावे लागत होते, ते विद्यार्थ्यांना नातेपुते या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोर्सेससाठी बाहेरगावी करावी लागणारी धावपळ थांबणार आहे.

एस. एन. डी. करिअर अकॅडमीचे वैशिष्ट्य –

* तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन

* विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या सूक्ष्म नोट्स

* विषयानुसार टेस्ट सिरीज

* वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे सखोल मार्गदर्शन

* प्रशस्त हॉलची व शांत वातावरणाची अभ्यासिका

* मोफत वायफाय सुविधा

* मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे

* फिल्टर युक्त स्वच्छ पिण्याचे पाणी

* पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी

* सरावाकरीता सुसज्ज मैदानाची व्यवस्था

* संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाखाली

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनिमगाव मगराचे येथे पर्यावरण पुरक शिवजयंती साजरी, शिवप्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
Next articlePsy563 luckystriketattoo.ca/ Research Counselling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here