ताज्या बातम्याराजकारण

आ. बबनदादा शिंदे यांच्या दोन लाख मताच्या वक्तव्याने मोहिते पाटील समर्थक व कार्यकर्त्यांच्या बुडाला आग लागली…

माढा (बारामती झटका)

श्रीपुर-खंडाळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याचा लोकार्पण सोहळा माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्रीपुर येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात केलेली विकासकामे व सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने दोन लाख मताधिक्य देण्याचा संकल्प केलेला होता.

यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार नाना पाटील, सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोकराव चव्हाण यांच्यासह नगरसेवक, विविध गावचे आजी-माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बबनदादा शिंदे यांच्या दोन लाख मताधिक्याच्या संकल्पाने मोहिते पाटील यांचे समर्थक व कार्यकर्ते यांच्या थेट बुडाला आग लागली असल्याची चर्चा माढा व करमाळा मतदार संघासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात रंगलेली आहे. माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी भाषणामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकास कामे करीत असताना कधीही दुजाभाव केलेला नाही. आम्ही राष्ट्रवादीत आहोत, तरीसुद्धा आमच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करीत असताना आम्हाला विचारात घेतलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. अजितदादांकडे अर्थ खाते आलेले असल्यामुळे मतदार संघातील अनेक विकासकामांना निधी मिळणार आहे. भविष्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलून दाखवलेला होता.

सध्या बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अजितदादांच्या भूमिकेमुळे भविष्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम असल्याचा एक प्रकारे संदेश दिलेला होता. आमदार बबनदादा शिंदे यांच्या वक्तव्याने मोहिते पाटील समर्थक व कार्यकर्ते हवालदिल व बेचैन झालेले आहेत. बेताल वक्तव्य सोशल मीडियावर करीत आहेत, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर व संजयमामा शिंदे यांच्यात लढत झालेली होती. त्यावेळेला संजयमामा शिंदे यांना का? लीड दिले नाही असे वेगवेगळे कमेंट्स सोशल मीडियावर सुरू असल्याने माढा व करमाळा मतदार संघातील शिंदे समर्थक आक्रमक झालेले आहेत. तसेच या वक्तव्यामुळे मोहिते पाटील समर्थक व कार्यकर्त्यांच्या थेट बुडाला आग लागलेली आहे. निश्चितपणे पाणीदार खासदार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावलेले आहेत. त्यामधील पाण्याने समर्थक व कार्यकर्त्यांची बुडाला लागलेली आग विझवली जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे समर्थक यांच्यातून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort