Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करा – जिल्हाप्रमुख महेश चिवटे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना युवा सेनाच्या तीन शाखांचे उद्घाटन

करमाळा (बारामती झटका)

प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी स्वतः १२ कोटी रुपये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरण थांबवले आहे. खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्यातील सभासदांच्या मदतीला धावून जाण्याचे काम प्राध्यापक तानाजीराव सावंत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केले असून यामुळे करमाळा तालुक्यात सावंत बंधूंच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवळाली, खडकेवाडी, रोसेवाडी येथे शिवसेना युवा सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वय प्रियदर्शन साठे, युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, जिल्हा समन्वयक चांदगुडे, शहर प्रमुख सागर गायकवाड, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, सुधीर आवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील ११८ गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शाखा उद्घाटन करून संघटना मजबूत करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून त्याप्रमाणे शाखा उद्घाटन सुरू आहे.

यावेळी राहुल कानगुडे म्हणाले की, सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेना तत्पर असून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या पद्धतीने युवा सेना काम करणार आहे.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यात शिवसेनेला मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. आता संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महाराष्ट्रातील विकासामुळे जनता शिंदे-फडवणीस सरकारवर खुश आहे.

लवकरच करमाळ्यात शिवसेनेच्यावतीने आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेणार असून या मेळाव्यातून सावंत बंधू सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort