ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते ह. भ. प. सोहम महाराज देहूकर यांचा सन्मान करण्यात आला..

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा बारामती मुक्कामी असताना सन्मान केला….

बारामती (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे वंशज श्रीक्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ह. भ. प. बापूसाहेब देहुकर महाराज यांचे चिरंजीव युवा कीर्तनकार ह. भ. प. सोहम महाराज देहूकर यांचा तुकाराम महाराज यांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा बारामती मुक्कामी असताना अतिथी देवो भव या हिंदू संस्कृतीप्रमाणे साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाने तुकोबारायांच्या वंशाजांचा यथोचित्य सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देण्याचे काम दिवंगत अजितदादांचे सुरू होते. दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणांच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तव्य, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्य शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचलेला होता. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते तर प्रत्येकाच्या हक्काचे दादा होते.

असे दादा अचानक काळाने घाला घालून जनतेमधून स्वर्गात गेलेले आहेत. असे महाराष्ट्राचे विकासप्रिय नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांचा वसा व वारसा सक्षमपणे सुमित्रा वहिनी सांभाळत आहेत, याचा सर्व अजितदादा प्रेमी यांना गर्व व अभिमान आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button