उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार खऱ्या अर्थाने महिषासुरमर्दिनी ठरणार…

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वकीय व परकीय राजकीय महिषासुरांचा पराभव अटळ!
बारामती (बारामती झटका)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचे अधिकृत 21 उमेदवार हजारोंच्या मताधिक्याने विजयी होणारच, अशी ठाम चर्चा सध्या मतदार आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या खऱ्या अर्थाने महिषासुरमर्दिनी ठरणार असल्याची खुमासदार चर्चा रंगली आहे.

विकासपुरुष दिवंगत अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सोमेश्वर कारखाना सभासद व कामगारांचे हित जोपासत जोमाने सुरू आहे. दादा हयात नसले तरी दादांचे विचार आजही प्रत्येक सभासद शेतकऱ्याच्या मनात जिवंत आहेत.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात करून विरोधात रणशिंग फुंकले. लोकसभा व विधानसभेला पारंपरिक असणाऱ्या विरोधकांनीही स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. मात्र, सुनेत्रावहिनींनी पार्थदादा आणि जयदादा यांना सोबत घेऊन, दादांच्या विचाराच्या जुन्या-जाणत्या माणसांना आणि तरुणांच्या उत्साहाला बरोबर घेऊन निवडणुकीच्या रणनीतीला सामोरे गेल्या आहेत. राजकारणातील उमलते नेतृत्व जयदादा आणि पार्थदादा यांनी जय-वीरूच्या जोडीसारखी दमदार कामगिरी केली आहे.

योगायोग पाहा! शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात रविवार दि. 11/10/2026 रोजी घटस्थापनेने होत आहे आणि याच दिवशी श्री सोमेश्वर कारखान्याचे मतदान जवळपास 85 टक्के झाले आहे. देवीने जसा महिषासुराचा वध करून जनतेला आनंद दिला, तसाच या निवडणुकीत स्वकीय व परकीय राजकीय महिषासुरांचा पराभव करून सुनेत्रावहिनी महिषासुरमर्दिनी ठरतील, अशी सभासदांमध्ये चर्चा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



