वेळापूर परिसरात मावा व गुटखा माफीयांनी डोके वर काढले, खुलेआम जोरदार विक्री सुरू…

आयुक्त तुकाराम मुंढे व सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी लक्ष देण्याची गरज, नागरिक व पालकांमधून चर्चा..
वेळापूर (बारामती झटका)
अन्न व भेसळ आयुक्त पदाचा पदभार महाराष्ट्रातील सर्वपरिचित असणारे श्री. तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक भेसळ करणारे व गुटखा, मावा विक्री करणारे यांच्यावर कडक कार्यवाही करून अशा बेकायदेशीर गोष्टींना आळा बसला होता. मात्र, भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा मावा व गुटखा माफियांनी डोके वर काढलेले आहे. अर्धनारी नटेश्वर नगरी वेळापूर परिसरात मावा व गुटखा माफियांची खुलेआम जोरदार राजरोसपणे विक्री सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे व सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी लक्ष देऊन माफीयांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी नागरिक व पालकांमधून चर्चा सुरू आहे.

वेळापूर शहर लोकसंख्येने मोठे आहे. आसपासच्या गावातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव, प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे महिला, लहान मुले अशा अनेक गोष्टींमुळे हजारो लोकांचा दैनंदिन कामासाठी वेळापूर गावाशी संबंध येत असतो. जिल्हा परिषद शाळा, कॉलेज, महाविद्यालय परिसर, मुख्य चौक अशा ठिकाणी पानटपऱ्या, हॉटेल, जनरल स्टोअर्स अशा ठिकाणी राजरोस खुलेआम मावा व गुटखा मिळत आहे. यामुळे शालेय विद्यार्थीसुद्धा सहज उपलब्ध होत असून व्यसनाकडे वळत आहेत. वेळापूर शहर माळशिरस तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात आहे.
कर्नाटकमधून येणारा गुटखा पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागातून येत असतो. पहिलेच मोठे स्टेशन असल्याने आयसीआर कॅन्टर, पिकअप दररोज वेळापूर पंचक्रोशीत माफीयांच्या माध्यमातून वितरित केले जाते. किरकोळ विक्रेते ग्राहकांना खुलेआम देत आहेत. पूर्वी चोरून विकला जाणारा मावा व गुटखा आता खुलेआम झालेला आहे, कशामुळे खुलेआम झालेला आहे, याच्या मुळाशी जाण्याकरता आयुक्त तुकाराम मुंढे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संयुक्त मोहीम राबवून स्पेशल पथक तयार करून माफीयांसह किरकोळ विक्रेते यांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी सुज्ञ नागरिक व पालकांमधून चर्चा सुरू आहे….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



