Uncategorized

साई सहारा मेडिकल अँड हेल्थ एज्युकेशनने नृत्याविष्कारासाठी मुलामुलींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले – सत्यप्रभादेवी मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

अकलूज आणि परिसरातील मुलामुलींना 16 एप्रिल ते 1 मे या उन्हाळी सुट्टीमध्ये मुंबई, पुणेच्या धर्तीवर साई सहाराच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी हिपहॉप, अर्बन, सेमी क्लासिकल, बॉलीवूड अँड वेस्टर्न, क्रंप आणि बी-बॉइंग भरतनाट्यम, कथ्थक यांसह वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य शिबिराच्या माध्यमातून शिकवलेच. परंतु, या मुलामुलींना नृत्याविष्कारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, हे कौतुकास्पद गोष्ट आहे, असे सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

साई सहारा मेडिकल हेल्थ अँड हेल्थ एज्युकेशनल अकॅडमी आणि कलामूर्ती डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथील स. म. शंकरराव मोहिते पाटील स्मृतीभवन या ठिकाणी या नृत्य शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, डॉ. राहुल जवंजाळ, डॉ. श्रद्धा जवंजाळ, पोलीस अधिकारी अनुजा पाटील सोलापूर, गौरी नाईक पुणे, जयश्री शेलार सातारा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्मृतीभवन अकलूज येथे साई सहारा मेडिकल हेल्थ अँड एज्युकेशनल अकॅडमी संचलित कलामूर्ती डान्स अकॅडमीच्या स्टेपअप व्हॉल्यूम 4 या डान्स व नृत्य प्रकारामुळे अकलूज आणि परिसरातील विद्यार्थ्यांना नवनवीन प्रकारची नृत्य शिकावयास तर मिळालीच. परंतु, याचबरोबर या नृत्य प्रकाराकडे एक कला म्हणून न पाहता याकडे मुला-मुलींनी करिअर म्हणून पाहिले तरी वावगे ठरणार नाही, असेही सांगितले.

स्मृतीभवनच्या मंचावर चिमुकल्यासह अनेकांनी यावेळी आपली कला सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीस स. म. शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील व कलेची देवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुणे येथील सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी आर.जे. बंड्या एफ. एम‌. यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्मृतीभवनच्या रंगमंचावर वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सादर होत असताना कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी लहानग्यांच्या नृत्याविष्काराला मनमुराद दाद तर दिलीच परंतु, कार्यक्रमासाठी सपत्नीक आलेले आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सौभाग्यवती सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या मनोगतानंतर प्रेक्षकात बसून नृत्याविष्कार पाहत असताना स्वखुशीने रंगमंचावर जाऊन लहानग्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे तोंडभरून कौतुक करून त्यांच्या नृत्याविष्काराला दाद दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort