ताज्या बातम्याविशेषशैक्षणिकसामाजिक

यशवंतनगर ग्रामपंचायतने स्वच्छता ही सेवा कचरामुक्त भारत निर्माल्य कुंड आणि गणेश विसर्जन हौद निर्मिती केली आहे.

ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी शंकरनगर, अकलूज व शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अकलूज या संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सहभाग..

शंकरनगर ग्रामपंचायतीचे सत्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रमाचे आयोजन…

यशवंतनगर (बारामती झटका)

यशवंतनगर, ता. माळशिरस या ग्रामपंचायतीने स्वच्छता ही सेवा कचरा मुक्त भारत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन योजनेअंतर्गत निर्माण कुंड आणि गणेश विसर्जन हौद अशी संकल्पना राबवून गणेशाचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच युवा नेते सत्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. वर्षाराणी सरतापे, ग्रामविकास अधिकारी विजय नवले यांनी अकलूज-यशवंतनगर रोडवर गणपती विसर्जनामध्ये निसर्गाचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण व विसर्जनाच्या वेळी होणारे अपघात धोके कमी होण्याकरता स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे.

सदरच्या उपक्रमामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अकलूज व ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी शंकरनगर या शाळेचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोर पाटील व अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.

यशवंतनगर ग्रामपंचायतने गेल्या तीन वर्षापासून सदरचा उपक्रम राबविलेला आहे. या उपक्रमामुळे पाण्याचे प्रदूषण व पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये यशस्वी मदत होत आहेत. विहिरीत किंवा तलावात गणपती विसर्जनाच्या वेळी पाण्यात पडण्याचे, बुडण्याचे धोके टळत आहेत. अशा स्तुत्य उपक्रमाचे गणेशभक्तांकडून कौतुक केले जात आहे. अनेक गणेशभक्त सार्वजनिक व व्यक्तिगत गणपती विसर्जनासाठी आवर्जून येत आहेत. येणाऱ्या गणेशभक्तांना राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहकार्य व मदत करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button