झी टॉकीज मन मंदिरा फेम संगीत विशारद ह. भ. प. ज्ञानेश्वरीताई घाडगे, टाकळीकर यांचे गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त मोफत नेत्र तपासणी, भव्य रक्तदान शिबिर, कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
कै. नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. १४/०५/२०२६ रोजी कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज मन मंदिरा फेम संगीत विशारद ह. भ. प. ज्ञानेश्वरीताई घाडगे, टाकळीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

तसेच कमल फाउंडेशन, कर्णवर पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीनेमोफत नेत्र तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १५/०५/२०२६ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी येथे करण्यात आले आहे.
यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
नजर चुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त कर्णवर पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



