ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस नगरपंचायतीवर पुन्हा देशमुख “राज”, शिवाजीराव देशमुख बिनविरोध नगराध्यक्ष झाले.

देशमुख परिवारातील द्रौपदी देशमुख, डॉ. आप्पासाहेब देशमुख, वस्ताद शिवाजीराव देशमुख यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीवर पुन्हा देशमुख “राज” पहावयास मिळालेला आहे. माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख बिनविरोध नगराध्यक्ष झालेले आहेत. देशमुख परिवारातील द्रौपदी देशमुख, डॉ. आप्पासाहेब देशमुख, वस्ताद शिवाजीराव देशमुख यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला आहे.

माळशिरस ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेले आहे. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. आप्पासाहेब देशमुख उपनगराध्यक्ष तर द्रौपदी देशमुख नगराध्यक्ष झालेल्या होत्या. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष तर वस्ताद शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष व आता विद्यमान नगराध्यक्ष झालेले आहेत‌. माळशिरस नगरपंचायतीमध्ये देशमुख “राज” पहावयास मिळत आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत व निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. केंद्रात व राज्यात ज्याप्रमाणे राजकीय घडामोडी घडत होत्या, त्याच धर्तीवर माळशिरस नगरपंचायतीमध्येसुद्धा राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. राजकीय घडामोडी देशमुख यांचे दोन गट एकत्र येऊन ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व इतर समित्या यांच्यामध्ये निवडी होत आहेत. ठरल्याप्रमाणे वस्ताद शिवाजीराव देशमुख यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला आहे.

माळशिरस शहरामध्ये माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय बापूनाना देशमुख व स्वर्गीय वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय ज्ञानदेव उर्फ देना देशमुख यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये माळशिरस शहराचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये केलेला होता. स्वर्गीय ज्ञानदेव देशमुख यांचा अकाली मृत्यू झालेला होता. स्वर्गीय ज्ञानदेव देशमुख यांचे चिरंजीव शिवाजीराव देशमुख आहेत. लहानपणी वडिलांचे छत्र हरपले, वडील आठवत सुद्धा नाहीत, अशा लहान वयात शिवाजीराव यांचे वडील स्वर्गवासी झालेले होते. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख यांनी शिवाजीराव यांना पोटचा मुलगा असल्यासारखे पोटाशी धरून सांभाळ केला. शिवाजीला कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही. शिवाजीराव यांनी सुद्धा तात्यांचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही. सर्वच चुलत्यांची आज्ञा पाळून समाजामध्ये समाजकारण व राजकारण सुरू होते. वडिलांची कुस्ती क्षेत्रातील आठवण म्हणून ज्ञानदेव उर्फ देना देशमुख कुस्ती संकुल उभा करून स्वतः शिवाजीराव वस्ताद म्हणून काम पाहत होते. फायनान्स, छोटी-मोठी कामे, शेती यामधून शिवाजीराव देशमुख यांचे सामाजिक कार्य सुरू होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवाजीराव यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये नगरसेवक झाले. तसा शिवाजीराव यांचा राजकीय पिंड नाही परंतु, नशिबात असल्यानंतर काहीही होऊ शकतं.

कोरोनाच्या कालावधीत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला अडचणीत जीवनावश्यक वस्तू व इतर मदत करून जनतेच्या मनामध्ये शिवाजीराव यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली होती. नगरसेवक होण्याच्या अगोदर मातोश्री यांचे दुःखद निधन झालेले होते. परंतु, स्वर्गीय आई-वडिलांचा आशीर्वाद व चुलते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख व इतर चुलते यांचे मोलाचे सहकार्य व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख यांचे विशेष सहकार्य असल्यामुळे शिवाजीराव देशमुख नगरसेवक बनले. योगायोगाने राजकीय घडामोडी घडत गेल्या. पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाले आणि आत्ता बिनविरोध नगराध्यक्ष झालेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. नऊ तारखेला अधिकृत नगराध्यक्ष पदाची घोषणा होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

59 Comments

  1. canadian pharmacy 24h com [url=https://canadaph24.pro/#]Certified Canadian Pharmacies[/url] canadian online pharmacy reviews

  2. indian pharmacies safe [url=https://indiaph24.store/#]buy medicines from India[/url] online pharmacy india

  3. ciprofloxacin generic price [url=http://ciprofloxacin.tech/#]where can i buy cipro online[/url] cipro pharmacy

  4. lisinopril 19 mg [url=https://lisinopril.network/#]lisinopril 40 mg no prescription[/url] lisinopril 50 mg price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort