कृषी पर्यवेक्षक एस. एस. देवकते यांचेकडून पीएम किसान योजनेतील केवायसी काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

माळशिरस तालुक्यातील पीएम किसान योजनेमधील शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा होण्याकरता केवायसी करणे गरजेचे असते.
मांडवे (बारामती झटका)
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेतून बँकेत पैसे जमा होत असतात. काही लाभार्थ्यांनी केवायसी न दिल्याने बँकेत पैसे जमा होत नाहीत. तालुका कृषी अधिकारी पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस मंडल कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक एस. एस. देवकते यांचे केवायसी जोडण्याचे काम मांडवे येथील कॉमन सर्विस सेंटर येथे युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यांना सहकार्य कृषी सहाय्यक रणजीत वलेकर, सीएससी सेंटर चालक भास्कर शिंदे आणि संजय सुळे यांचे सहकार्य मिळत आहे.
मांडवे परिसरात केवायसी अपूर्ण असणारे 334 लाभार्थी होते. त्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेत अंतर्गत पैसे जमा होत नव्हते. यासाठी कृषी पर्यवेक्षक एस. एस. देवकते यांनी कॉमन सर्विस सेंटर येथे थांबून शेतकऱ्यांचे केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या 150 लोक राहिलेले आहेत. त्यांचेही केवायसी करण्याचे काम सुरू आहे. केवायसी साठी आधार कार्ड, मोबाईल नंबर व स्वतः व्यक्ती हजर असावी लागते.
माळशिरस तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांची केवायसी करावयाची राहिली असेल तर त्यांनी नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर येथे संपर्क साधून केवायसी करून घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांमध्ये जर केवायसी केली नाही तर पीएम किसान योजनेअंतर्गत जमा होणारे पैसे याला अडचण येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी केवायसी करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng