डॉ. अप्पासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते अकलूज मध्ये एस आर ऑनलाईन ई सर्विस उद्घाटन शुभारंभ होणार….

अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक डॉक्टर आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांच्या शुभहस्ते अकलूज येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एस आर ऑनलाईन ई सर्विस सेंटरचा उद्घाटन शुभारंभ शुक्रवार दि. 28/08/2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजता संपन्न होणार आहे.
एस आर ऑनलाईन ई सर्विस मुळे एकाच ठिकाणी ऑनलाइन सेवा, बँकिंग सेवा, बिल पेमेंट सेवा, ट्रॅव्हल्स सेवा, इन्शुरन्स सेवा, झेरॉक्स, कलर झेरॉक्स, लॅमिनेशन, प्रिंट आऊट, स्कॅनिंग, फोर्स प्रिंट अशा सुविधा एकाच ठिकाणी सुरू होणार आहेत.

सदरच्या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेवरावजी कावळे यांच्यासह अकलूज नगर परिषद नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे व इतर सामाजिक संघटनांचे राज्य, जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांना विनंती आहे आपली उपस्थिती आम्हास प्रोत्साहन देईल. असे एस आर ऑनलाईन ई सर्विस टीमच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



