ताज्या बातम्यासामाजिक

झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे माने वस्ती कण्हेर येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. तानुबाई माने पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

कण्हेर (बारामती झटका)

कै. तानुबाई साहेबराव माने पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन शुक्रवार दि. २८/८/२०२६ रोजी माने वस्ती, कण्हेर, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरण निमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून किर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. श्रीमंत साहेबराव माने-पाटील, श्री. शिवाजी साहेबराव माने-पाटील, श्री. लक्ष्मण साहेबराव माने-पाटील, श्री. अंकुश साहेबराव माने-पाटील, श्री. सागर श्रीमंत माने-पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी आपणांस नजर चुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त माने पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button