बारामतीत दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिराचे आयोजन

बारामती (बारामती झटका)
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वेळापत्रकानुसार बारामती तालुक्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स वितरणाचे ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, बारामती येथे आयोजित करण्यात आले आहे.
एस.आर. ट्रस्ट, मध्यप्रदेश व अॅलिम्को (ALIMCO), मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अधिकृत फॅब्रिकेटिंग एजन्सीचे तज्ज्ञ उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष मोजमाप घेणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स व इतर सहाय्यभूत साधनांचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे.

या शिबिराचा लाभ केवळ पात्र अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींनाच मोफत मिळणार आहे. बारामती तालुक्यातील सर्व पात्र अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींनी यूडीआयडी प्रमाणपत्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



