कोंडबावी येथे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, मारुतीराया मुर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार

मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ह.भ.प.बाल ब्रम्हचारी सुधाकर महाराज इंगळे, सोलापूर यांचे शुभहस्ते होणार
कोंडबावी (बारामती झटका)
कोंडबावी, ता. माळशिरस येथे समस्त ग्रामस्थ कोंडबावी यांच्या वतीने श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, मारुतीराया मुर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.
शनिवार दि.२९/०८/२०२६ रोजी सकाळी ठीक १० ते १२ वाजेपर्यंत मुर्ती मिरवणुक सोहळ्याचे आयोजीत करण्यात आले आहे.

रविवार दि.३०/०८/२०२६ रोजी पहाटे ५ ते १० या वेळेत सर्व मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन ह.भ.प.बाल ब्रम्हचारी सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांचे शुभहस्ते होणार असुन त्यानतंर १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बाल ब्रम्हचारी सुधाकर महाराज इंगळे यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा निमीत्त हरी किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे. तरी सर्व ग्रामस्थ मंडळीनी वेळेवर उपस्थित राहुन क्रार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती आयोजक समस्त ग्रामस्थ मौजे कोंडबावी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



