Uncategorizedताज्या बातम्या

कैवल्य साम्राज्य सर्वश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र पादुकांचे व अश्वांचे दर्शन आ. राम सातपुते व सौ. संस्कृतीताई यांनी घेतले.

ज्ञानोबा माऊलीच्या पालखीतील तुळशी वृंदावन डोक्यावर घेण्याच्या संस्कृतीची आमदार पत्नी संस्कृतीताईंनी जपली.

पानिव पाटी खुडूस येथील गोल रिंगण भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सुविद्य पत्नी संस्कृतीताई सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न.

माळशिरस ( बारामती झटका )

टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत || माळशिरस तालुक्यातील पानिवपाटी खुडुस येथील गोल रिंगणाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कैवल्य साम्राज्य सर्वश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र पादुकांचे व मानाच्या अश्वाचे दर्शन आमदार राम सातपुते व संस्कृतीताई सातपुते यांनी घेतले. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील तुळशी वृंदावन डोक्यावर घेण्याची संस्कृती आहे, या संतांच्या भगिनींची संस्कृतीची आमदार पत्नी संस्कृतीताई यांनी जपलेली आहे.

अश्व धावे अश्वामागे,
वैष्णव उभे रिंगणी ||
टाळ मृदंगा संगे,
गेले रिंगण रंगूनी ||

या काव्य रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या दोन नेत्रदीपक फेऱ्या दौडीला प्रारंभ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात माउली माउली नामाचा उद्घोष सुरू असतानाच लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या व वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा हा दुसरा गोल रिंगण सोहळा आज मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात खुडूस ग्रामपंचायत हद्दीत पार पडला.

यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. कारण दोन वर्ष रिंगण सोहळा कोरोनामुळे होऊ शकला नाही. या रिंगण सोहळ्याने भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी रथा पुढील दिंड्याही त्या ठिकाणी दाखल झाल्या. या दिंडीमध्ये पुरुष व महिला वारकरी सहभागी झाले होते. भजनाच्या तालावर ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करीत या दिंडीने उपस्थित लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. माउलींचा रथ सोहळा पानिवपाटी या ठिकाणी पोहोचला. रथ रिंगण ठिकाणी वरून गोल फिरवून मध्य ठिकाणी ठेवण्यात आली. त्यानंतर पालखीची पूजा करण्यात आली. चोपदार बाळासाहेब यानी रिंगण लावून घेतले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन धारक महिला, झेंडेकरी यांचे गोल रिंगण झाले. झेंडेकरी यांनी पहिल्यांदा गोल फेरी मारून अश्वांना गोल रिंगण दाखवले. पुणे येथील राजश्री जुन्नरकर यांनी आकर्षक अशी रांगोळी रिंगणाभोवती काढल्यामुळे अनेकाची मने आकर्षित होत होती. सकाळी रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले आणि माऊली माऊली असा जयघोष करीत फेरे पूर्ण केले. दोन्ही अश्वांनी रथासमोर सत्तावीस दिंडी व रथामागील वीस दिंड्यासमोर नेत्रदीपक दौड घेत लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेेडले. यावेळी विठुनामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबालवृद्धांचे भान हरपले होते. वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. गोल रिंगण सुरू असतानाच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानबा तुकारामाचा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघी पानीवपाटी असंमत दुमदुमले.

अश्व पुढे जात असताना त्यांच्या चरणी असणारी रस भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. रसभाळी कपाळी लावून त्यातच धन्यता मानली. त्यानंतर महिला पुरुषांनी फुगडय़ांचे फेर धरले तर, कोणी टाळ मृदुंगांच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान नाही, थोर नाही या भावनेने प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत होते.

रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले. दिंड्या-दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने “ज्ञानोबा माऊली तुकाराम” अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा ब्रह्मनाद सुरू झाला. वृद्व, महीला आणि अवघी तरुणाई तल्लीन होऊन श्‍वास रोखून या ब्रह्मनादात लीन होऊन गेली होती. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्‍वत सुखाचा सोहळा भाविकांनी अनुभवला.

वैष्णवांची पाऊले पंढरीच्या दिशेने झपझप पङत होती. प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, सोहळा प्रमुख योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब त्यांच्यासह पालखी सोहळा निमगाव पाठीच्या दिशेने रवाना झाला. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व संस्कृतीताई सातपुते यांच्या उपस्थितीत गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडीचे सरपंच लक्ष्‍मण उर्फ पिनू माने, तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांच्यासह पानीव, डोंबाळवाडी, खुडूस, झंजेवाडी, झंजेवस्ती, घुलेवस्ती व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button