जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाकडे आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाकडे लक्ष लागून राहिलेले होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दि. 13 जुलै 2022 रोजी आरक्षण निघणार असा आदेश निवडणूक आयोग यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत.
राज्यातील 25 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असणाऱ्या 284 पंचायत समितीमध्ये आरक्षण सोडत सात जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केलेला आहे.
या आदेशानुसार सात जुलै रोजी आरक्षण सोडतीची सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाची असून 13 जुलै रोजी सर्व संवर्गाच्या आरक्षण सोडत घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
25 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असणाऱ्या 284 पंचायत समितीच्या प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदरचा कार्यक्रम 27 जून 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जिल्हाधिकार्यालय येथे होणार आहे. तर पंचायत समितीचे आरक्षण तहसील कार्यालयात होणार आहे. आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचे उभे राहण्याचे भवितव्य समजणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Odowidjwoidwo wojdwkslqmwjfbjjdwkd jkwlsqswknfbjwjdmkqendj kedwjdbwhbdqjswkdwjfj eqwkdwknf baramatizatka.com
This piece was both insightful and engaging. Id love to dive deeper into this topic with you all. Click on my nickname for more content!