ताज्या बातम्या

‘ज्यूस जॅकिंग’ स्कॅम, मोबाईल चार्ज होईपर्यंत बँक खातं होईल रिकामं…

RBI नेही दिला इशारा

मुंबई (बारामती झटका)

घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली तर आपण कुठेही चार्जर चार्जिंगला लावतो. तुम्हीही असे करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. सध्या गुन्हेगार ज्यूस जॅकिंग स्कॅममधून लोकांना आपली शिकार बनवत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही अशा गुन्ह्यांबाबत लोकांना सावध केले आहे.

ज्यूस जॅकिंग घोटाळा काय आहे?

ज्यूस जॅकिंग घोटाळा ही मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांमधून महत्त्वाचा डेटा चोरण्याची पद्धत आहे. या प्रकारचा घोटाळा करण्यासाठी, सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअरसह सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल केले जात आहेत. यूएसबी पोर्ट किंवा चार्जिंग किऑस्क यांसारख्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनद्वारे सायबर गुन्हेगार लोकांची शिकार करतात.

लक्षात ठेवा मोबाईलचा चार्जिंग पोर्ट फाईल/डेटा ट्रान्सफरसाठी देखील वापरला जाऊ शकतो. सायबर गुन्हेगार तिथे कनेक्ट केलेल्या फोनवर मालवेअर ट्रान्सफर करण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करतात. एखाद्या व्यक्तीच्या मोबाइल फोनवरून ईमेल, एसएमएस, सेव्ह केलेले पासवर्ड इत्यादी संवेदनशील डेटावर नियंत्रण, प्रवेश किंवा डेटा चोरतात.

ज्यूस जॅकिंग स्कॅममुळे संभाव्य आर्थिक नुकसान होऊ शकते. कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसमधून संवेदनशील माहिती जसे की पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर किंवा बँकिंग क्रेडेन्शियल्स चोरून तुमच्या आर्थिक खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी वापरू शकतात.

सामान्य माणूस कसा बळी ठरतो?

हे सायबर गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर सॉफ्टवेअर किंवा मालवेअर इन्स्टॉल करतात. यासाठी ते अनेकदा विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनला लक्ष्य करतात.

विनामूल्य चार्जिंगचे आमिष हे गुन्हेगार चार्जिंग स्टेशनला “फ्री चार्जिंग” स्टेशन म्हणून लोकांना आकर्षित करतात. मोफत असल्याने लोक कसलाही विचार न करताच फोन चार्जिंगला लावतात.

जेव्हा वापरकर्ता त्यांचे डिव्हाइस (जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट) या चार्जिंग स्टेशनशी USB केबलद्वारे कनेक्ट करतो, तेव्हा गुन्हेगार सॉफ्टवेअर किंवा मालवेअरद्वारे डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवतात. हे लोक नंतर कनेक्ट केलेल्या उपकरणांमधून पासवर्ड, फोटो, संपर्क किंवा इतर वैयक्तिक माहिती यांसारखा संवेदनशील डेटा चोरू शकतात. काही प्रकरणांमध्ये, वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल केले जाऊ शकते, जे चार्जिंग स्टेशनवरून डिस्कनेक्ट केलेले असतानाही, कुठूनही डिव्हाइसमध्ये प्रवेश करू देतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button