Uncategorized

पंचायत समिती माळशिरस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

वाघोली (बारामती झटका)

जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती माळशिरस येथील दि. ३१/५/२०२३ रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पंचायत समिती माळशिरस येथील सभागृहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी श्री. विनायकजी गुळवे साहेब होते.

माळशिरस तालुका ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस, पाणीपुरवठा उपविभाग माळशिरस, पंचायत समिती माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये श्री. पंडित भोसले उपभियंता जलसंधारण लघु पाटबंधारे माळशिरस, श्री. व्ही. कोळेकर, श्री. के. व्ही. खरात, श्री. बी. डी. मुंडफने, श्री. पी. बी. शिखरे, श्री. बी. एस‌. सूळ, श्री. हर्षवर्धन नाचणे विस्तार अधिकारी, पंचायत समिती माळशिरस, श्री. गायकवाड वरीष्ठ सहाय्यक, श्री. नारायण साठे हातपंप विभाग आदी कर्मचारी दि. ३१/५/२०२३ रोजी शासकीय वयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

सेवानिवृत्तीनिमित्त पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी श्री. विनायकजी गुळवे साहेब, जिल्हा परिषद बांधकामचे उप अभियंता श्री. आर. एस. रणनवरे, पाणीपुरवठा उपभाग माळशिरसचे उप अभियंता श्री. के. एस. बाबर, ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. डी. के. गोरे, तालुकाध्यक्ष व्ही. एस. माने देशमुख, मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, एस. बी. मुंगुस्कर, श्री. पानसरे भाऊसाहेब, श्रीमती एस. आर. भापकर, श्रीमती ए. एस. शिंदे, श्रीमती बी. के. कारंजकर, ग्रामसेवक संघटनेचे माळशिरस तालुक्याचे पदाधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित ग्रामसेवक बंधूंनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीबाबत शुभेच्छा दिल्या. तसेच सत्कारमूर्तीनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा केलेल्या सत्कार सोहळ्याबाबत आभार व्यक्त करून भविष्यात पंचायत समिती माळशिरसच्या सर्वच विभागांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी श्री. विनायकजी गुळवे साहेब यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबास वेळ देऊन आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण कराव्यात. तसेच आपले उर्वरित भावी आयुष्य सुखाचे व आनंदी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

सदर कार्यक्रमास पंचायत समिती माळशिरसचे कक्ष अधिकारी श्री. बी. एच. कदम, श्री. एम. आर. बुगड, डोके साहेब, वगरे भाऊसाहेब, एकतपुरे भाऊसाहेब, नवले भाऊसाहेब, एस. एम. पवार भाऊसाहेब, बाबर भाऊसाहेब, पंचायत समिती माळशिरसचे सर्वच ग्रामसेवक, ग्रामसेविका, जिल्हा परिषद बांधकामचे कर्मचारी, पाणीपुरवठा विभाग माळशिरस, लघु पाटबंधारे विभाग माळशिरस, महिला व बालकल्याण विभाग माळशिरस, पशु संवर्धन विभाग माळशिरस, आरोग्य विभाग पंचायत समिती माळशिरस, पंचायत समिती माळशिरसचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी करून श्री. पी. बी. काळे भाऊसाहेब यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button