Uncategorized

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरता करणभैया पाटील यांचे पुण्यावरून खास आगमन….

माजी आमदार शामरावभाऊ पाटील यांच्या संस्कारावर पानीवकर पाटील यांची तिसरी पिढी समाजकारणात अग्रेसर

अकलूज (बारामती झटका)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती अकलूज येथील महर्षी चौकामध्ये अहिल्या प्रतिष्ठानच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक विकास घुले पाटील, अध्यक्ष समाधान काळे पाटील व अहिल्या प्रतिष्ठानमधील कार्यकर्ते व अहिल्याप्रेमींनी आयोजन केलेले होते.

सदरच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींना अभिवादन करण्याकरता करणभैया प्रकाशराव पाटील खासकरून पुण्यावरून येऊन अहिल्यादेवींना अभिवादन केलेले आहे. त्यावेळेस मार्गदर्शक अजितभैया बोरकर, संस्थापक विकास घुले पाटील, अध्यक्ष समाधान काळे पाटील, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार शामरावभाऊ पाटील यांनी घालून दिलेले संस्कार, ते जपण्याचे काम पानीवकर पाटील यांची तिसरी पिढी समाजकारणात अग्रेसर असल्याचा प्रत्यय आलेला आहे.

श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते प्रकाश बापू पाटील व श्रीराम शिक्षण संस्थेच्या सचिव माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. श्रीलेखा पाटील यांचे चिरंजीव करणभैया पाटील आहेत. त्यांच्या डोळ्याचे नुकतेच ऑपरेशन झालेले असल्याने ते पुण्यामध्ये होते. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला होता. मात्र, अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक विकास घुले पाटील व कार्यकर्त्यांचा आग्रह होता, करणभैया काहीही झालं तरी तुम्हाला यावंच लागतंय. यामुळे करणभैय्या यांनी डोळ्याचे ऑपरेशन केलेले असतानासुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना महर्षी चौकामध्ये येऊन अभिवादन केलेले आहे. पानीवकर पाटील यांची तिसरी पिढी यांनी सुद्धा समाजामध्ये वेगळी नाळ निर्माण केलेली आहे, यावरून दिसून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort