पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व विठ्ठल पालवे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते रोपांचे वाटप
मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीचे औचित्य साधून व मांडवे ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल पालवे पाटील यांचा वाढदिवस दोन्ही एकाच दिवशी असल्याने यानिमित्त सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते तीनशे रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी सत्कार करून केक कापण्यात आला.
मांडवे ता. माळशिरस येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मांडवे गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे समजून जयंतीच्या आदल्या दिवशी रक्तदान शिबिर घेतलेले होते. जयंतीच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन अहिल्याप्रेमी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच विठ्ठल पालवे पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन निलराज मित्र परिवार, अमोल शिंदे मित्र परिवार, उत्तमराव जानकर युवा मंच, महादेव पालवे मित्र परिवार, पप्पू चव्हाण मित्र परिवार, रितेश दादा पालवे मित्र परिवार, भास्कर शिंदे मित्र परिवार यांनी केलेले होते.
त्याचवेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून विठ्ठल पालवे पाटील यांचा वाढदिवस फेटा बांधून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng