भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच पक्ष नंबर एकवर – के. के. पाटील
माळशिरस (बारामती झटका)
भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच पक्ष नंबर एकवर असल्याचे मत खुडूस येथे घेण्यात आलेल्या मोदी @9 जनसंपर्क अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक बैठक अभियानामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. के. पाटील बोलत होते. जेष्ठ प्रकोप प्रदेशाध्यक्ष सुरेश खिस्ते, जिल्ह उपाध्यक्ष सोपान नारनवर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, हनुमंत धालपे, लक्ष्मण गोरड, युवराज वाघमोडे, हनुमंत कर्चे, राहूल मदने, गणेश पागे, सुनिल बनकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या कार्याकाळाला नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत. नऊ वर्षांत विकासाच्या मुद्द्यावर काम केले. मोदीमुळे कोरोना लस भारतीय लोकांना मोफत देण्यात आली. ही लस इतर देशांनाही देण्यात आली. कोरोना काळात लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे मोफत धान्य पुरवले. रस्ताच्या कामांना वेग आला. भारत देश हा बऱ्याच वस्तु आयात करीत होता, आता तो निर्यात करतो आहे. मोदीमुळे देशाचे नाव जगात नंबर एकला घेतले जाते. त्यामुळेच मोदीजींना पुन्ह एखादा सत्ता देणे गरजेचे आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सरगर यांनी केले तर आभार बाळासाहेब वावरे यांनी मानले. सदर कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng