Uncategorized

माणसातील देव माणसाचा वाढदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपन्न झाला…


ग्रामीण भागात गरिबांना परवडणारे, श्रीमंतांना आवडणारे, रुग्णांना दिलासा देणारे, देवदूत असणारे डॉ. सचिन शेंडगे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू…

विझोरी ( बारामती झटका )

विझोरी ता. माळशिरस येथील श्री अष्टविनायक क्लिनिकचे माणसातील देव माणूस असणारे डॉ. सचिन सुदाम शेंडगे यांच्यावर वाढदिवसानिमित्त लहानथोर मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांना परवडणारे, श्रीमंतांना आवडणारे आणि रुग्णांना दिलासा देणारे असे देवदूत असणारे डॉ. सचिन सुदाम शेंडगे यांचा वाढदिवस माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर आणि शेतकरी संघटनेमधील शिलेदारांनी निमगाव पाटी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयासमोर थाटामाटात व उत्साही वातावरणात संपन्न केला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित (भैय्या) बोरकर, जेष्ठ नेते मगन काळे साहेब, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम-पाटील, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे, सोमेश्वर राजगे, पै. दादासाहेब काळे, जनसेवेचे विठ्ठल माने, विलास काळे, साधू राऊत, समाधान काळे, अहिल पठाण, विजय वाघबंरे, गणेश काळे, अभिजित गवळी आदी कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. सुदाम शेंडगे व सौ. कांताबाई शेंडगे यांचे विझोरी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्यांना मुलगा सचिन व तीन मुली अशी अपत्ये आहेत. लहानपणापासून खेळकर व चुणचुणीत असणारे सचिन शेंडगे यांनी शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी संपादन केली आहे. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी फिरता दवाखाना ठेवलेला होता. रुग्णांच्या घरी, शेतात जिथे कुठे कामावर असतील तिथे जाऊन औषध उपचार केलेला आहे. डॉ. सचिन शेंडगे यांच्या हातामध्ये वेगळे कौशल्य आहे. इंजेक्शनची भीती असणाऱ्या लोकांना इंजेक्शन कधी दिले याची जाणीवसुद्धा होत नाही. फरक मात्र तासाभरात जाणवायला सुरवात होते. यामुळे डॉ. सचिन शेंडगे यांच्याकडे पंचक्रोशीमध्ये गोरगरिबांना परवडणारे, श्रीमंतांना आवडणारे आणि रुग्णांना दिलासा देणारे देवदूत म्हणून पाहिले जाते. पैशासाठी कधीही रुग्णांची अडवणूक केली नाही किंवा पैसे असणाऱ्या व्यक्तीकडून ज्यादा पैशाची अपेक्षा त्यांनी केलेली नाही.

डॉ. सचिन शेंडगे यांनी 2005 साली श्री अष्टविनायक क्लीनिक पुणे-पंढरपूर रोड, निमगाव पाटी चौक, पालखी कट्ट्याच्या समोर स्वतःच्या क्लिनिकची सुरुवात केली. त्यामध्ये दीर्घकाळ सांधेदुखी, मणकेदुखी, कंबरदुखी, सांधेवात, जळवात, दमा, एलर्जी जुनाट सर्दी, इसबगोल व गजकर्ण अशा अनेक व्याधींवर डॉ. सचिन शेंडगे यांचा हातखंड आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये रुग्णांना दिलासा दिलेला होता. अनेक रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत. बाहेरच्या तालुक्यातील लोकांनी डॉ. सचिन शेंडगे यांचा देवदूत म्हणून सन्मान केलेला आहे. डॉ. सचिन शेंडगे आणि अजितभैया बोरकर यांची अतूट मैत्री आहे. मराठी शेतकरी संघटनेच्या संपर्कामध्ये असणारे डॉ. सचिन शेंडगे यांचा ४२ वा वाढदिवस दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निमगाव पाटी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालया समोर धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात संपन्न केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button