माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच पदासाठी ११६ तर सदस्य पदासाठी ८३९ अर्ज दाखल
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. दि. २८/११/२०२२ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची निवडणूक प्रक्रिया तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गावनिहाय सरपंच पदासाठी ११६ तर सदस्य पदासाठी ८३९ अर्ज दाखल झालेले आहेत.
आज दि. २/१२/२०२२ रोजी कोळेगाव येथे सदस्य पदासाठी ८, फळवणी येथे सदस्य पदासाठी ५, काळमवाडी येथे सदस्य पदासाठी १७ तर सरपंच पदासाठी ३, तिरवंडी येथे सदस्य पदासाठी २८ तर सरपंच पदासाठी ५, कचरेवाडी येथे सदस्य पदासाठी १९ तर सरपंच पदासाठी ४, मारकडवाडी येथे सदस्य पदासाठी २० तर सरपंच पदासाठी २, निमगाव येथे सदस्य पदासाठी २५ तर सरपंच पदासाठी ३, मेडद येथे सदस्य पदासाठी १८, उंबरे दहीगाव येथे सदस्य पदासाठी ३१ तर सरपंच पदासाठी ३, पिसेवाडी येथे सदस्य पदासाठी २५ तर सरपंच पदासाठी ४, तामशिदवाडी येथे सदस्य पदासाठी ९ तर सरपंच पदासाठी ४, पानिव येथे सदस्य पदासाठी २२ तर सरपंच पदासाठी १, आनंदनगर येथे सदस्य पदासाठी २३ तर सरपंच पदासाठी ४, बागेची वाडी येथे सदस्य पदासाठी २१ तर सरपंच पदासाठी ५, चांदापुरी येथे सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी २, पठाणवस्ती येथे सदस्य पदासाठी ६ तर सरपंच पदासाठी १, इस्लामपूर येथे सदस्य पदासाठी ३५ तर सरपंच पदासाठी ३, यशवंतनगर येथे सदस्य पदासाठी २३ तर सरपंच पदासाठी २, संगम येथे सदस्य पदासाठी १३ तर सरपंच पदासाठी ३, चौंडेश्वरवाडी येथे सदस्य पदासाठी ५३ तर सरपंच पदासाठी ५, खंडाळी दत्तनगर येथे सदस्य पदासाठी ३५ तर सरपंच पदासाठी ५, धानोरे येथे सदस्य पदासाठी ३९ तर सरपंच पदासाठी ६, उघडेवाडी येथे सदस्य पदासाठी १९ तर सरपंच पदासाठी २, माळेवाडी (बो.) येथे सदस्य पदासाठी ३० तर सरपंच पदासाठी ५, नेवरे येथे सदस्य पदासाठी १० तर सरपंच पदासाठी ४, जांभूड येथे सदस्य पदासाठी ४३ तर सरपंच पदासाठी ४, लोंढे मोहितेवाडी येथे सदस्य पदासाठी ६ तर सरपंच पदासाठी ५, सदाशिवनगर येथे सदस्य पदासाठी २८ तर सरपंच पदासाठी ९, पुरंदावडे येथे सदस्य पदासाठी ४१ तर सरपंच पदासाठी ५, पळसमंडळ येथे सदस्य पदासाठी १२, तांबेवाडी येथे सदस्य पदासाठी ८ तर सरपंच पदासाठी १, गुरसाळे येथे सदस्य पदासाठी १५ तर सरपंच पदासाठी १, तरंगफळ येथे सदस्य पदासाठी ३३ तर सरपंच पदासाठी ५, मोटेवाडी येथे सदस्य पदासाठी १९ तर सरपंच पदासाठी २, वेळापूर येथे सदस्य पदासाठी ८१ तर सरपंच पदासाठी ८ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
असे एकूण यादिवशी सदस्य पदासाठी ८३९ तर सरपंच पदासाठी ११६ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi
Excellent content! The clarity and depth of your explanation are commendable. For a deeper dive, check out this resource: EXPLORE FURTHER. What do you all think?