ताज्या बातम्या

वाघोली वि.का.से. संस्थेच्या चेअरमन पदी बिभीषण मिसाळ यांची बिनविरोध निवड

वाघोली (बारामती झटका)

वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्या असल्यामुळे तसेच व्हा. चेअरमन श्री. रामचंद्र भगवान मिसाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन या दोन्हीही जागा रिक्त होत्या. दि. २४ जुलै रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज यांच्या आदेशाने चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीची सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. चेअरमन पदासाठी श्री. बिभीषण जनार्दन मिसाळ व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. अशोक बाबा शेंडगे यांचे प्रत्येकी एक एक अर्ज आल्यामुळे सदरची निवड प्रक्रिया ही बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमन पदी श्री. बिभीषण मिसाळ व व्हाईस चेअरमन पदी श्री. अशोक बाबा शेंडगे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

सदरची विकास संस्था महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सह. महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील उर्फ (बाळदादा), विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे व वि. का. वि. संस्थेचे माजी चेअरमन विष्णू वासुदेव मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून माळशिरस तालुक्यात एक नावारूपाला आलेली अतिशय चांगल्या प्रकारची संस्था म्हणून नावलौकिक आहे.

चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीनंतर नवनिर्मित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा मावळते चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदरवेळी संस्थेचे मार्गदर्शक सूर्यकांत चांगदेव शेंडगे, विष्णू वासुदेव मिसाळ, माजी चेअरमन अशोक चव्हाण, माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र मिसाळ, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत उपसरपंच पंडित मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश माने, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे, माजी चेअरमन बळीराम मिसाळ, संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, माजी उपसरपंच हनुमंत मिसाळ, स्कूल कमिटीचे सभापती चंद्रसेन मिसाळ, तुषार पाटोळे, अशोक चव्हाण, सिद्धेश्वर मिसाळ, मंगेश शेंडगे, संदीप भोसले, रमेश पाटील, राहुल मिसाळ, संस्थेचे सभासद युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरची निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूजचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना वि.का.वि. संस्थेचे सचिव श्री. जाधव यांनी सहकार्य केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Very well written! The points discussed are highly relevant. For further exploration, I recommend visiting: LEARN MORE. Keen to hear everyone’s opinions!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort