आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त SP गणेशोत्सव मंडळ, खंडाळी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

खंडाळी (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त SP गणेशोत्सव मंडळ, खंडाळी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दि. २३/९/२०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत श्री. मारुती अंकुश अवघडे यांच्या निवासस्थानी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे करण्यात आले आहे.

यामध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, सामान्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी खंडाळी व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, खंडाळी-दत्तनगर व अनुसूचित जाती मोर्चा अकलूज मंडल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button