रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना चारपट रक्कम मोबदला मिळणार; बाधित शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण…

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येर गबाळाचे काय काम…”
माळशिरस (बारामती झटका)
ब्रिटिशकालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग, कागदावरील रेल्वे मार्ग, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून प्रत्यक्षात रुळावर येत आहे.
फलटण ते पंढरपूर या बहुचर्चित रेल्वे प्रकल्पाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री ना. श्री. अश्विनीजी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपर्क साधत, या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना चालू बाजार भावाच्या तब्बल चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावर मंत्री महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रेल्वे मार्ग प्रकल्प सुरू होईल असेही आश्वासित करण्यात आलेले होते.
सदर बैठकी प्रसंगी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार श्री. सचिन पाटील, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर मॅडम, तहसीलदार डॉ. श्री. अभिजित जाधव, श्री. शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेते श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर आणि अन्य शासकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. सदरची बातमी वाऱ्यासारखी फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पसरली. बाधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना चारपट रक्कम मिळणार असल्याने बाधित शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झालेले असून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतील २४६० व्या अभंगाचा प्रत्यय येतोय.
नका दंतकथा येथे सांगू कोणी!
कोरडे ते मानी बोल कोण!
अनुभव येथे पाहिजे साचार!
न चलती चार आम्हा पुढे!
वरी कोण मनी रसाळ बोलणे!
नाही झाली म्हणे वोळखी तों!
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी!
राजहंस दोन्ही वेगळाली!
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे!
येर गबाळाचे काय काम!
या अभंगामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, नका दंतकथा सांगू, कोरडं बोलूच नका, खऱ्या अर्थानं अनुभव पाहिजे साचार, न चलती आम्हा पुढे रसाळ बोलणे, ओळखले जाते, खरा राजहंस असतो तो दूध आणि पाणी बाजूला करतो. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात पाहिजे जातीचे येथे, येड्या गबाळ्याचे काय काम, असा हा असणारा अभंगाचा प्रत्यय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यातून दिसून येत आहे.

ब्रिटिश काळापासून कितीतरी खासदार आले गेले परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अथक प्रयत्न व पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे.
लोकप्रतिनिधी खासदार कसा असावा हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक सिंचनाचे प्रलंबित प्रश्न, रस्त्याचे, महामार्गाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. कागदावर असणारा लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाची सध्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. लोणंद ते फलटण पूर्ण झालेले आहे, फलटण ते पंढरपूर लवकरच पूर्ण होईल. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी कार्य करण्यासाठी ताकद उभी आहे. सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेऊन रणजितदादांची राजकीय वाटचाल पुढे सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



