ताज्या बातम्यासामाजिक

ज्येष्ठ लावणी नृत्यांगना आणि लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचे दुःखद निधन.

शकुंतला नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी कर्करोगाने दुःखद निधन

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला, पारंपरिक बैठकीची लावणी आणि संगीत बारीच्या समृद्ध वारशाला आपल्या नृत्याने सजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि लावणी क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात असून अवघ्या सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. शकुंतला नगरकर या सहकार महर्षी शंकर मोहिते पाटील यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त पहिल्याच वर्षी सुरु केलेल्या 1993 सालच्या स्पर्धेतील त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी होत्या.ंं

शकुंतला नगरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य लावणी कलेच्या संवर्धनासाठी आणि सन्मानासाठी वेचलं. पारंपारिक संगीत बारीमधील बैठकीची लावणी, शृंगारिक अदा, डोळ्यांतील भावमुद्रा आणि नजाकत यावर शकुंतलाबाईंचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या प्रत्येक अदाकारीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा ठसा उमटलेला असायचा.

केवळ पारंपारिक तमाशा किंवा संगीत बारीच्या मंचापुरते मर्यादित न राहता त्यांनी लावणीचा आदर आणि प्रतिष्ठा अभिजात रंगभूमीवर पोहोचवली. भूषण कोरगावकर यांच्या दिग्दर्शनाखालील ‘संगीत बारी’ या लोकप्रिय नाट्यरूप प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक शहरी प्रेक्षकांना आणि तरुण पिढीला अस्सल लावणीचा इतिहास व सौंदर्य दाखवून दिले.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी पुरस्कार प्राप्त 2013 उत्कृष्ट लावणी नृत्यांगणा श्रीमती शकुंतला नगरकर यांचे दुःखद निधन झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही जयंती समारंभ समितीच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आणि प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button