वेळापूर येथील वासुदेव बाळकृष्ण देशपांडे यांचे अल्पशा आजाराने दुःखात निधन झाले.
परमपूज्य डॉक्टर भाईनाथ महाराज यांचे प्रधान सेवक वसुदेव देशपांडे उर्फ भाऊ काळाच्या पडद्याआड.
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर तालुका माळशिरस येथील परमपूज्य डॉक्टर भाईनाथ महाराज यांचे परमपूज्य प्रधान सेवक वासुदेव बाळकृष्ण देशपांडे उर्फ भाऊ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी शनिवार दिनांक 29 10 20 22 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे भाऊंच्या पश्चात पत्नी दोन मुले ज्ञान व श्रीधर एक मुलगी रत्ना चार भाऊ, भावजय, बहिण, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे भाऊंच्या पार्थिव देहावर परमपूज्य भाईनाथ महाराज यांच्या समाधी स्थळा शेजारी दुपारी तीन वाजता अग्निसंस्कार करण्यात येणार आहे.

परमपूज्य डॉक्टर भाईनाथ महाराज यांनी समाधी घेतल्यापासून प्रधान सेवक म्हणून भाऊंनी भाईनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे मनोभावे पूजा अर्चा करून भाईनाथ महाराज यांचे शिष्य गण संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातून विविध धार्मिक कार्यक्रमासाठी येत असतात अशा सर्व साधकांची सुखसुविधा व सेवा करण्याचे काम भाऊंनी अविरतपणे केलेले होते वयोमानानुसार ज्ञान व श्रीधर आणि त्यांचे सर्व बंधू आलेल्या सर्व साधकांचे व भाईंच्या समाधीची सेवा करीत होते कायम भाऊंचे मार्गदर्शन लाभत होते अचानक भाऊंना देवाज्ञा झाल्याने देशपांडे परिवार त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे भाऊंच्या मृतात्म्यास चिरशांती व देशपांडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.