Uncategorized

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठीच खासगी दूध संघाची दूध दर कपात – कमलाकर माने देशमुख

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली दहा दिवसापासून दुधाचे भाव चार रुपये कमी करण्यात आलेले आहेत व सध्या उन्हाळा चालू असून दुधाचे उत्पादन कमी असताना मागणी जास्त आहे. तरीसुद्धा दुधाचे भाव फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच जाणूनबुजून राजकीय स्वार्थापाटी व शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याकरता कमी केलेले आहेत, असा संतापजनक सुर शेतकऱ्यांतून निघत आहे.

एकीकडे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना त्याच्यामध्ये कधी सुद्धा कपात होत नाही आणि कोणतेही कारण नसताना दुधाचे भाव मात्र मनमानी पद्धतीने कमी केले आहेत. या मनमानी केलेल्या खाजगी दूध संघावर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकरतात्या माने देशमुख, रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे, स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, वेळापूर शहराध्यक्ष सचिन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

इतर दूध संघाचे दूध दर स्थिर असताना सोनाई दूध संघाचे दूध दर कपात करण्यात आले आहेत या विरोधात रस्त्यावर उतरू. – मदनसिंह जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button