Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

सोहम तळेकर याचा नीट व सीईटी परीक्षेतील यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार

विठ्ठलवाडी येथील समस्त गुंड परिवाराच्या वतीनेही विशेष सत्कार

माढा (बारामती झटका)

बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व मोहोळ तालुक्यातील देवडी येथील रहिवासी सोहम शिवाजी तळेकर याने राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट” च्या परीक्षेत 720 पैकी 632 गुण व सीईटीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण प्राप्त करीत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादित करुन कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्याचा संस्थापक प्रा. डॉ. संजीव सोनवणे व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

सोहम तळेकर याने कोरोनाच्या संकटाच्या काळातही प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑनलाईन व ऑफलाईन तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे त्याने कोठेही खाजगी शिकवणी लावली नव्हती तरी, त्यांने दोन्ही पात्रता परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

यावेळी प्राचार्य अंकुश पांचाळ, मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, नगरसेवक शरद फुरडे, प्रा. विशाल गरड, प्रा. शशिकांत तरटे, प्रा. पियुष पाटील, प्रा. विक्रम पवार, प्रा. सुशील अबंदे, प्रा. सलमान सय्यद, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड जलवंती तळेकर, माधुरी गुंड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहम शिवाजी तळेकर याने नीट व सीईटी या दोन्हीही परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित करीत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील समस्त गुंड परिवाराच्या वतीने त्याचा सहकुटुंब सहपरिवार सत्कार पेढे भरवून सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व आजी शांताबाई गुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सुधीर गुंड, जलवंती तळेकर, उर्मिला पासले, मेघना गुंड, प्राथमिक शिक्षिका माधुरी गुंड, दिपक तळेकर, राजवर्धन गुंड, शिवम गुंड, मेघश्री गुंड, समृद्धी गुंड यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button