ताज्या बातम्या
वेळापूर येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली नियोजन बैठकीचे आयोजन…

वेळापूर (बारामती झटका)
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा दि. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौरा आहे. सदरच्या शांतता रॅली नियोजनाची बैठक वेळापूर ता. माळशिरस, येथील इंद्रनील मंगल कार्यालय, वेळापूर येथे दि. 29 जुलै 2024 रोजी दुपारी 01 वाजता सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित केलेली आहे.
तरी सर्व मराठा समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे सकल मराठा समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.