युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावतीने बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचा सन्मान
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-07-at-19.38.20_d125c1f1-780x470.jpg)
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे निर्भीड व निष्पक्षपाती झुंजार संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांचा हार, श्रीफळ व फेटा देऊन सन्मान केला.
बारामती झटका वेब पोर्टलचे दोन कोटी वाचक आणि यूट्यूब चॅनलचे एक कोटी प्रेक्षक असणारे लोकप्रिय व वाचनीय बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे निर्भीड व निष्पक्षपाती झुंजार संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा सन्मान करून यशस्वी कार्याचा आलेख असाच चढता राहावा अशी मनोकामना व्यक्त केली आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विश्वासू सहकारी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सतीशनाना पालकर हजर होते. तसेच माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-02-at-16.37.28_1f7b42a7.jpg)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.