ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सभापती संस्कृतीताई सातपुते यांच्याकडून समाज कल्याणची झाडाझडती; कार्यालयाची अवस्था पाहून संतापल्या !

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांनी मुख्यालयात आपल्या कामांची जोरदार सुरुवात केली आहे. त्या सध्या ऍक्शन मोडवर असून समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला त्यांनी अचानक भेट दिली.

कार्यालयाची अक्षरशा: झाडाझडती घेतली, कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरील फायली त्यांनी तपासल्या, कपाट तपासली, अचानक सभापती आल्याने कर्मचारी सुद्धा बिथरले.

कार्यालयाची अवस्था पाहून त्या संतापल्याचे पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता त्यामुळे त्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान समाज कल्याण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची पाहणी केली, तिथली परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने आतील स्वच्छता करून ही लायब्ररी पुन्हा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रभारी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाज करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button