कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

निरा देवधरचे फलटण ते माळशिरस मुख्य बंदिस्त नलिकेच्या पहिल्या टप्प्याची प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध..

फलटण (बारामती झटका)

फलटण, माळशिरस आणि सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरादेवधर प्रकल्पाला ४० वर्षे झाली. या तालुक्याच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले आहे. अगदी मृतप्राय झालेल्या या योजनेस उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी नवसंजीवनी दिली. फक्त मान्यताच नाही तर निधीही दिला. माढा लोकसभेतील जनतेच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक आभार. हा महत्त्वाकांक्षी निरा देवधर प्रकल्प आहे. आज निरा देवधर प्रकल्पाच्या मुख्य वितरण व्यवस्था कॅनॉलची निविदा प्रसिद्ध झाली. या कामासाठी एकुण १८९८८.०६ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्याची किमी ७७ ते ८७ निविदा प्रसिद्ध झाली आहे.

फलटण ते माळशिरस तालुक्याकडे जाणारे वाहिनीचे काम पुर्ण होणार. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत माळशिरसच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले जाणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस व पंढरपूर-सांगोल्यातील काही भाग या भागाला पाणी उपलब्ध होऊन या भागाचा कायमस्वरूपी चा दुष्काळ संपणार आहे.

या तिन्ही तालुक्यातील गावातील लोकांना यांचा फायदा होईल. माझ्या व मतदार संघाचे दृष्टीने हा भाग्याचा एक क्षण. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या दुष्काळ संपवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते आज पूर्ण होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील गावांना याचा लाभ होणार आहे. गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत‌. परंतु, मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही. खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील इंच ना इंच जमीन भिजवण्याचे स्वप्न मी पाहिलं होतं. ते आज राज्य सरकारने पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहाणार आहे.

भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही. स्वतःचे शेतीबरोबरच व्यवसाय सुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील हरितक्रांती बरोबरच आर्थिकक्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर शेतीबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort