महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून कु. प्रदीप गोरड चे यश तर वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मच्छिंद्र गोरड यांना मास्टर ऑफ सर्जन ची पदवी.
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावच्या शिरपेचात शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला
गोरडवाडी ( बारामती झटका )
गोरडवाडी ता. माळशिरस या गावातील कु. प्रदीप गोरड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर डॉ. मच्छिंद्र गोरड यांना वैद्यकीय क्षेत्रातील मास्टर ऑफ सर्जन ची पदवी प्रदान झाल्याने गोरडवाडी गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला असल्याने केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव म्हणून दोघांचा गावामध्ये मोठ्या उत्साहात व आनंदात सन्मान संपन्न झालेला आहे.
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी सारख्या ग्रामीण भागातुन शिक्षण घेवून गावाचे नाव उज्वल केले. प्रदिप दुर्योधन गोरड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन जिद्द, चिकाटी व अथक प्रयत्नातून यश संपादन केले आहे. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यमगरवस्ती येथे १ ते ४ थी पर्यंत, तर ५ वी ७ चे माध्यमिक शिक्षण गिताई प्रशाला मोटेवस्ती, ८ ते १० माळशिरस प्रशाला माळशिरस, उच्च माध्यमिक गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे झाले असून त्यांनी बी.ए. ची पदवी मुक्त विद्यापिठ नाशिक येथून पूर्ण केली. पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. लोकसेवा आयोगाच्या २५ मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन राज्यसेवा रँक १८१ मिळाला आहे. सर्व परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तसेच डॉ. मच्छिंद्र भगवान गोरड यांचे शिक्षण १ ते ४ थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यमगरवस्ती व ५ वी ते १० वी गिताई प्रशाला मोटेवस्ती, ११ वी व १२ वी गोपाळराव देव प्रशाला माळशिरस, बी.ए.एम.एस. लोकनेते राजारामबापु पाटील & मेडीकल कॉलेज इस्लामपूर सांगली, एम.एस. आण्णासाहेब डांगे मेडीकल कॉलेजमध्ये मास्टर ऑफ सर्जरी (शल्यचिकित्सक) पूर्ण केले आहे. तसेच त्यांना ९ वर्षाचा वैद्यकिय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल गोरडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने दोन्ही सुपुत्राचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच विजयराव गोरड, माजी उपसरपंच शंकर यमगर, माजी सरपंच बाळासाहेब गोरड, गोरडवाडी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन खंडुतात्या कळसुले – पवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, माणिक कोकरे, नवनाथ केंगार, दुर्योधन गोरड, हरिबा हुलगे, दादा गोरड, पोलीस पाटील नानासाहेब यमगर, सोमनाथ हुलगे, सुरेश गोरड, सुग्रीव गोरड, सुभाष गोरड, गोरख गोरड, शंकर मिसाळ, ब्रम्हदेव हुलगे, निलेश हुलगे, लक्ष्मण बंडगर, रणजीत गोरड, लक्ष्मण गोरड, रावसाहेब शिंगाडे आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!
proventil ventolin: buy albuterol inhaler – buy cheap ventolin online
buy ventolin uk
buy ventolin without prescription: buy albuterol inhaler – ventolin online
ventolin discount coupon