पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मन की बात शंभराव्या कार्यक्रमाचे भारतीय जनता पक्षाचे वतीने गावोगावी प्रसारण…
माळशिरस तालुक्यात नरेंद्रजी मोदी यांच्या शंभराव्या ” मन की बात ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात पदाधिकाऱ्यांनी गावोगावी घरोघरी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मन की बात या शंभराव्या कार्यक्रमाचे प्रसारण करून पाहण्याची माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भाजपा जिल्हा सहप्रभारी व जिल्हा नियोजन समिती सदस्य के.के.पाटील जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर ओबीसी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे जिल्हा चिटणीस सुरेश तरंगे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख शहराध्यक्ष संतोष वाघमोडे उपाध्यक्ष राजू वळकुंदे तालुका चिटणीस हनुमंत कर्चे व ज्ञानेश्वर शेळके युवा मोर्चा सरचिटणीस युवराज वाघमोडे युवा नेते विशू पाटील अमर मगर हनुमंत शिंदे अतुल सूर्यवंशी मिनीनाथ मगर सुनिल कोळेकर शंभुराजे नारनवर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानाची मान उंच झाली आहे.
आरोग्य सेवा शेतकऱ्यांना विविध सवलती प्रचंड वेगाने होत असलेला रेल्वेचा विस्तार पंतप्रधान सडक योजनेमार्फत लाखो किलोमीटरचे होत असलेली देशात पक्के रस्ते नवनवीन उद्योगामुळे रोजगाराच्या संधी मिळत असलेल्या पंतप्रधान उद्योजकता योजनेने मधून तरुणांना मिळत असलेले कर्ज यामुळे देशात नवीन आर्थिक क्रांती होत आहे
महाराष्ट्राला सुद्धा पंतप्रधान सडक योजने मधून नवीन दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत
यापुढील काळात शेतकऱ्यांना मोफत पाणी मोफत वीज हे धोरण केंद्र शासन स्वीकारण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत
या सर्व बाबीची माहिती नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या कार्यक्रमात देत आहेत आज शंभरव्या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत कार्यक्रमाचे प्रसारण करून जनजागृती करण्यात आली होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng