चि. चैतन्य सपकाळ, माळशिरस आणि चि. सौ. कां. शिवानी घोगरदरे (जाधव), बारामती यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक – श्री. दत्तात्रेय राजाराम सपकाळ, मु. पो. ता. माळशिरस, जि. सोलापूर
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय राजाराम कृष्णा सपकाळ यांचे नातू व सौ. कल्पना व श्री. महादेव राजाराम सपकाळ सर रा. माळशिरस, जि. सोलापूर, यांचे सुपुत्र चि. चैतन्य आणि स्वर्गीय अर्जुन रामभाऊ घोगरदरे (जाधव) यांची नात व सौ. रत्नावली व श्री. सुनील अर्जुन घोगरदरे (जाधव) रा. सोलापूर ह. मु. बारामती यांची सुकन्या चि. सौ. कां. शिवान यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. 23/07/2024 रोजी दुपारी 12 वाजून 02 मिनिटे या शुभ मुहूर्तावर मोनिका लॉन्स जळोची रोड, नक्षत्र गार्डन जवळ, बारामती जि. पुणे, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. दत्तात्रेय राजाराम सपकाळ आणि समस्त सपकाळ परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त सपकाळ परिवार, माळशिरस यांच्या वतीने लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.