लोकप्रिय दमदार रामाने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा १४ वर्षांचा पाण्याचा वनवास संपवला, विकासाचं दुसरं नाव रामभाऊ हाय…

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीवर तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट घेऊन नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अनुवेषन उपविभाग क्रमांक ०४ माचनूर अंतर्गत शाखा क्रमांक ०२ साठी उन्हाळा हंगामामध्ये कायमस्वरूपी वाढीव पाणी कोटा मंजूर करावा यासाठी भेट घेतली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या सकारात्मक चर्चा होऊन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रिमार्क मारून कार्यवाही करण्याचे सुचित केलेले असल्याने माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले गावातील शेतकऱ्यांचा २०११ पासून लढा चालू होता. सर्व गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा रास्ता रोको, आंदोलने केलेली होती. मात्र, कायद्यात तशी तरतूद असताना आजपर्यंत कालवा सल्लागार समितीने कधीच हा निर्णय घेतलेला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते. सध्या लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पुढाकार घेऊन जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सदरच्या गावांना आठमाही पाण्यावरून बारमाही पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या १४ वर्षापासून शेतकऱ्यांच्या लढ्याला लोकप्रिय दमदार रामाने पाठपुरावा करून यश आणल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा वनवास संपवला असल्याने विकासाचे दुसरे नाव रामभाऊ हाय, अशी तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले गावातील शेतकऱ्यांमधून चर्चा सुरू होऊन आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिलेल्या पत्रामध्ये लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी निरा उजवा फलटण विभाग अंतर्गत माचनूर उपविभाग शाखा क्रमांक ०२ मधील पाणी वापर संस्थेने १६६०० हेक्टर क्षेत्र अधिसूचित केले आहे. परंतु, शाखा क्रमांक दोन ला उन्हाळा हंगामासाठी इतर वेळेस साधारण ८००० क्युसेक्स पाणी मंजूर होते त्या ऐवजी १२००० क्युसेस पाणी मंजूर करावे, जेणेकरून उन्हाळा हंगामामध्ये शेतकऱ्यांना दोन आवर्तन मिळतील. तसेच शाखा क्रमांक ०२ हे माचनूर उपविभागाला जोडल्यामुळे बारमाही ब्लॉक पद्धत बंद होऊन ती आठमाही ब्लॉक पद्धत झाली. त्यामुळे शाखा क्रमांक ०२ मधील क्षेत्र हे माळशिरस तालुक्यातील असताना देखील माचनूर उपविभागाला जोडल्यामुळे दोन अवर्तनाऐवजी एक आवर्तन मिळत आहे. शाखा क्रमांक ०२ हे बारमाही करावी जेणेकरून माळशिरस तालुक्यामधील तांदुळवाडी, मळोली, फळवणी, कोळेगाव, धानोरे, शेंडेचिंच व तोंडले या गावांमध्ये जिरायत शेती ही बागायत होईल व या गावांना बारमाही पाणी मिळावे ही विनंती, असे पत्र देऊन सकारात्मक चर्चा करून पाठपुरावा केलेला आहे.

जलसंपदा विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये लवकरच निर्णय होऊन २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार समान पाणी वाटप व्हावे टेल टू हेड पाणी वाटपाची अंमलबजावणी व्हावी अशीही सर्व गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.