दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून प्रपंचाची आर्थिक उन्नती साधली…

खुडूस (बारामती झटका)
खुडूस, ता. माळशिरस येथील श्री. विठ्ठल चव्हाण व सौ. संगीता चव्हाण यांनी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून प्रपंचाची आर्थिक उन्नती साधलेली आहे. एक एकर शेती सुद्धा उद्योग व्यवसायाला कशा पद्धतीने चालना देते, याचा आदर्श चव्हाण दाम्पत्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे..
खुडूस येथील चव्हाण दांपत्य यांनी एक एकर शेतामध्ये अर्धा एकर ऊस व अर्ध्या एकरामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका अशी पिके घेतली जातात, हे दाखवून दिले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर खुडूस हद्दीत रस्त्याच्या बाजूला कृष्णाली रसवंतीगृह सुरू केलेले होते. ते गेल्या पाच वर्षापासून चांगल्या पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. देहू, आळंदी वरून शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूरकडे जाणारे भाविकभक्त व वैष्णव यांची वर्दळ कायम असते.


रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चव्हाण दांपत्यांनी कृष्णाली रसवंतीगृह सुरू केलेले आहे. एका बाजूला पती-पत्नी तर दुसऱ्या बाजूला मुलगा आणि सून असतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रसवंतीगृह सुरू असते. घराच्या हाकेपासून अंतरावर व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे शेतीकडे आणि गाय, म्हैस, शेळ्या याकडेही लक्ष ठेवता येते. चव्हाण दांपत्य भाविकांना व ग्राहकांना थंडगार उसाचा रस देत असतात. मात्र, स्वतः गरम भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंद लुटत असतात.
कष्ट हेच भांडवल, अशा पद्धतीने चव्हाण दांपत्यांनी रसवंतीगृहाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे. रसवंतीगृहाच्या व्यवसायाला सुरुवात करीत असताना खुस पर्यटन केंद्र वन विभागाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला व्यवसाय असल्याने वन विभागातील कर्मचारी नारायण यशवंत बनकर, ऋषी हर्ष इलेक्ट्रॉनिक्स खुडूस चे मालक सुहास शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त वन अधिकारी संजय महादेव लडकत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून कृष्णाली रसवंतीगृह उन्हाळ्याची चाहूल लागल्याने सुरू केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



