ताज्या बातम्याराजकारण

तुतारीवाल्यांनी मुतारी पिऊन धुंदीत झोपेत बडबडण्यापेक्षा उघडा डोळे बघा नीट. – माऊली हळणवर

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टर स्ट्रोक…

पंढरपूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यात मास्टर स्ट्रोक बसलेला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. नगरसेवक यांनी शतक पार केलेले आहे, असे असताना सोलापूर जिल्ह्यात जयकुमार गोरे भाऊ यांचा वाढता आलेख पाहून तुतारी वाल्यांनी मुतारी पिऊन धुंदीत झोपेत बडबडण्यापेक्षा उघडा डोळे बघा नीट, असे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते माऊली हळणवर यांनी जयाभाऊ यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या वाचाळविरांना टोला लगावलेला आहे..

https://www.facebook.com/watch/?v=1570793157527994

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जयाभाऊ यांच्याकडे आल्यापासून अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे. त्यामुळे खालून आग असल्यामुळे तोंडातून येईल ते शब्द वापरत आहेत. खऱ्या अर्थाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविलेली आहे. 2016 मध्ये दोन नगराध्यक्ष व 31 नगरसेवक होते. 2025 ला चार नगराध्यक्ष झालेले आहेत तर, 131 नगरसेवक झाले आहेत. नगरसेवकांच्या शतकामध्ये वाढ झालेली आहे.

महाराष्ट्रामध्ये भाजपचे 139 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. विदर्भ 58 उत्तर महाराष्ट्र 18, मराठवाडा 25, पश्चिम महाराष्ट्र 19, कोकण 09 अशी भाजपची दैदिप्यमान कामगिरी झालेली आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वावर महाराष्ट्राचा विश्वास तर जयाभाऊच्या नेतृत्वावर सोलापूर जिल्ह्याचा विश्वास आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा भाजप व महायुतीचा करिष्मा पहावयास मिळणार आहे. त्यामुळे तुतारीवाल्यांनी मुतारी पिऊन धुंदीत झोपेत बडबडणे बंद करावे, असाही सबुरीचा सल्ला ज्येष्ठ नेते माऊली हळणवर यांनी दिलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom