हनुमाननगर, मारकडवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी, ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२६ चे आयोजन रविवार दि. २९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र वश्या मारुती देवस्थान हनुमाननगर, मारकडवाडी गोरे वस्ती, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ५:०० ते ६:०० (रुद्र अभिषेक-सावित्री नदी जल महाड), सकाळी ६:०० ते ६:३० महाआरती (धूपआरती), रात्री ८:०० ते ९:०० महाआरती (सांजआरती), रात्री ९:०० ते १०:०० प्रसाद (अन्नदाते – गायकवाड, राऊत, शिंदे व भुजबळ वस्ती, हनुमान नगर), रात्री १०:०० ते ११:०० भजन (जागर).
सोमवार, दि. 30 मार्च २०२६ रोजी सकाळी ५:०० ते ६:०० (रुद्र अभिषेक-गायत्री नदी जल महाबळेश्वर), सकाळी ६:०० ते ६:३० महाआरती (धूपआरती), रात्री ८:०० ते ९:०० महाआरती (सांजआरती), रात्री ९:०० ते १०:00 प्रसाद (अन्नदाते – गोरेवस्ती, हनुमान नगर), रात्री १०:०० ते ११:०० भजन (जागर).

मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ५:०० ते ६:०० (रुद्र अभिषेक-कोयना नदी जल – प्रीतीसंगम कराड), सकाळी ६:०० ते ६:३० महाआरती (धूपआरती), रात्री ८:०० ते ९:०० महाआरती (सांजआरती), रात्री ९:०० ते १०:०० प्रसाद (अन्नदाते- वाघोले, वाघमोडे, दडस व बोराटे वस्ती, हनुमान नगर), रात्री १०:०० ते ११:०० भजन (जागर).
बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५:०० ते ६:०० (रुद्र अभिषेक-वेण्णा नदी जल- मेढा), सकाळी ६:०० ते ६:३० महाआरती (धूपआरती), सकाळी ९:१५ ते १२:१५ होम हवन पूजा, रात्री ८:०० ते ९:०० महाआरती (सांजआरती), रात्री ९:०० ते १०:००, प्रसाद (अन्नदाते- मारकडवाडी व मेडद ग्रामस्थ, हनुमान नगर), रात्री १०:०० ते ११:०० भजन (जागर)

गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ४:०० ते ५:१५ (रुद्र अभिषेक) (षोडशोपचार पूजा) – कृष्णा नदी जल संगम माहुली, सातारा), सकाळी ५:१५ ते ६:१७ – भजन, सकाळी ६:३४ जन्मोत्सव कार्यक्रम, सकाळी ६:४० ते ७:३० – भजन, सकाळी ७:३० ते ११:०० महाप्रसाद (जय बजरंग बली तरुण मंडळ, हनुमान नगर), रात्री ८:०० ते ९:०० महाआरती (सांजआरती) असा असणार आहे.

याविषयीच्या अधिक माहितीसाठी सुभाष गायकवाड ९९७५२७९९५३, हनुमंत गोरे ९५१८५५५९३९, पांडुरंग चोपडे ८७८८६२६२४४, आनंदा बोराटे ७८७५७४६५९४ यांच्याशी संपर्क साधावा.

तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



