महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार एकनाथ पराडे पाटील यांना प्रदान

वाघोली (बारामती झटका)
बाभुळगाव, ता. माळशिरस येथील श्री. एकनाथ पराडे पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणारा २०२४-२०२५ सालचा पुरस्कार शासनाने सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट, प्रधान सचिव कांबळे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे २६ तारखेला वितरित करण्यात आला.
श्री. एकनाथ पराडे हे गेल्या ३० वर्षांपासून गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात काम करीत आहेत. त्यांनी बाभुळगाव येथे व्यसनमुक्ती युवक संघाच्या कार्यकर्त्यांसमवेत बाभुळगाव येथे गेल्या २० वर्षांपासून दारूबंदी केली. गावातील व तालुक्यात व्यसनमुक्ती करण्यासाठी प्रसार व प्रचार करीत आहेत. तसेच संघटनेच्या वृक्षारोपण, रक्तदान, व्यसनमुक्तीमध्ये नेहमी सहभाग घेत असतात. त्यांनी माळशिरस तालुका व्यसनमुक्ती युवक संघ तालुका अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले आहे.

यावेळी माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील, चेअरमन पंडित पराडे, माजी सरपंच संभाजी पराडे, उपसरपंच अजित पराडे, शिवामृत संचालक बाळासाहेब पराडे हे उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



