मा. आमदार राम सातपुते यांची वेळापूर येथील स्व. रमाकांत देशपांडे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट..

विश्व हिंदू परिषदेचे पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत बाळकृष्ण देशपांडे यांचे दुःखद निधन…
वेळापूर (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी वेळापूर येथील स्वर्गीय रमाकांत देशपांडे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट गुरुवार दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी भेट घेतली. यावेळी परिवारातील मुलगा, बंधू, पुतणे असा परिवार उपस्थित होता…
स्वर्गीय रमाकांत बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९४९ साली झालेला आहे. त्यांनी एम. कॉम. शिक्षण पूर्ण केलेले आहे.
गेली तीस वर्षे औषध दुकान व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केलेले आहे. सध्या विश्व हिंदू परिषदेचे पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचे १० एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता कुंभार घाट, पंढरपूर येथे होणार आहे..

रमाकाका यांच्या आत्म्याला शांती लाभो व देशपांडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



