क्रीडाताज्या बातम्या

राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या ईश्वरी सम्राट मोरे हिने रौप्यपदक पटकावले

बारामती (बारामती झटका)

बारामती येथील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीची 11 वर्षीय खेळाडू ईश्वरी सम्राट मोरे हिने राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्री टीन 26-28 किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावले.

ईश्वरीने पुणे ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करत राज्यभरातील बलाढ्य खेळाडूंना कडवी झुंज दिली. आपल्या जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावाच्या जोरावर तीने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्यपदकावर नाव कोरले.

ईश्वरीच्या या यशामागे तीचे प्रशिक्षक साहेबराव ओहोळ सर यांचे मार्गदर्शन आणि योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीतील नियमित प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमी, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच बारामती परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ईश्वरी उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button