सुळकूड हायस्कूलच्या संचालकपदी धनंजय पोतदार यांची निवड.

अकलूज (बारामती झटका)
सुळकूड, (ता.कागल) येथील महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल सुळकूड च्या संचालकपदी धनंजय महादेव पोतदार यांची निवड करण्यात आली आहे.ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचे संचालकपदी निवड झाल्यामुळे तरूण वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच बरोबर सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सन १९८५ साली बाळासाहेब पाटील, सतिश घाळी यांच्या प्रयत्नातून सुळकूड हायस्कूल सुळकूड सुरू करण्यात आले. पुर्वीच्या काळी सुळकूड गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी शहराकडे जावे लागत होते. त्यावेळेस वाहनाची सोय नसल्यामुळे मुलांची शिक्षणासाठी गैरसोय होत होती.त्यामुळे गावातच हायस्कूल सुरू करण्यात आले.त्या दिवसापासून आजपर्यंत या गावातील विद्यार्थी सुळकूड हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.
सुळकूड हायस्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव सतिश घाळी यांनी धनंजय पोतदार यांची निवड करण्यात आली यावेळेस नूतन संचालक प्रदिप पाटील, ओंकार घाटे, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब पाटील, सचिन कांबळे, मुख्याध्यापक संजय मुद्दाणा, पप्पू परीट उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



